Ad will apear here
Next
क्रांतिफुले
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर जाणारे क्रांतिकारक चापेकर बंधूंच्या आयुष्यावर आधारित ही चरित्रात्मक कादंबरी आहे. चापेकर बंधूंच्या बलिदानाची भा. द. खेर यांनी लिहिलेली ही रसाळ आणि रोमांचकारी कहाणी आहे. पुण्यात प्लेगची साथ आली तेव्हा ब्रिटीश अधिकारी रँडने जनतेवर अत्याचार केले. त्याने महिला व लहान मुलांनाही सोडले नाही. हा अनन्वीत छळ चापेकर बंधूंनी पाहिला होता. अनुभवला होता.

ब्रिटीश साम्राज्याला धडका देण्याचा त्यांचा संकल्प रँडचा वध करून त्यांनी प्रत्यक्षात आणला; परंतु त्यांच्यावर खटला चालवून त्यांना फासावर लटकविण्यात आले. मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी एकाच कुटुंबातील तिघा बंधूंना फाशी देण्याची जगाच्या इतिहासातील ही कदाचित एकमेव घटना आहे. चापेकर बंधूंची जडणघडण कशी झाली, त्यांच्या मनात रुजलेले देशप्रेम आणि तत्कालीन स्थिती याचीही ही प्रेरणादायी कथा आहे.

प्रकाशक : विहंग प्रकाशन
पाने : २०८
किंमत : १७० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZRUBM
Similar Posts
आर्य भारत खंड दुसरा भारताच्या दहा हजार वर्षांच्या सांस्कृतिक इतिहासाचा हा हर्षद सरपोतदार यांनी थोडक्यात घेतलेला आढावा आहे. हिंदूधर्म, मनुस्मृती, वैदिक, वाङ्मय, चावार्क अशा टप्प्यांमधून हा इतिहास त्यांनी मांडला आहे. पुराणामधील भाकडकथा आणि इतिहास त्यांनी वेगळा करून सांगितला आहे. ऐतिहासिक चिकित्सेची चिकित्सा करताना ‘मोठमोठे
गीतांबरी वनवास, अज्ञातवास संपून पांडव परतल्यानंतर वचनाप्रमाणे त्यांना राज्याचा हिस्सा देण्यात दुर्योधनाने नकार दिला. यातूनच युद्ध उभे ठाकले. धर्म विरुद्ध अधर्माच्या युद्धासाठी कौरव-पांडव समोरासमोर आले; पण आपल्याच आप्तस्वकीयांना मारून विजय मिळवण्याला काय अर्थ आहे, असा विचार अर्जुनाच्या मनात डोकावला;
नागवेल ‘नागवेल’ कादंबरीचा परिचय...
नोबेल विजेता विनोद मोहिते आणि त्याची प्रेयसी विशाखा आपटे या दोघांभोवती फिरणारी ही उत्तम कदम यांची कादंबरी आहे. कादंबरीच्या प्रारंभीच वधस्तंभाकडे जाणारा धीरोदात्त नायक विनोद मोहिते समोर येतो मात्र, चमत्कार घडावा तशी त्याची फाशीची शिक्षा रद्द होते. फाशी रद्द होण्याचे कारण काय, मुळात त्याला फाशीची शिक्षा होण्याचे कारण काय, या सगळ्याची उत्तरे कादंबरीतून मिळतात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language